कुपवाडमधील तिघे दोन जिल्ह्यांतून तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST2021-02-09T04:30:18+5:302021-02-09T04:30:18+5:30

कुपवाड : शहरातील सराईत तीन गुन्हेगारांना मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी एका वर्षासाठी सांगली व कोल्हापूर या दोन ...

Tadipar through three two districts in Kupwad | कुपवाडमधील तिघे दोन जिल्ह्यांतून तडीपार

कुपवाडमधील तिघे दोन जिल्ह्यांतून तडीपार

कुपवाड : शहरातील सराईत तीन गुन्हेगारांना मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी एका वर्षासाठी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून तडीपार केले आहे. संशयित विशाल आप्पासाहेब निकम (वय ३०, रा.धनगर गल्ली, कुपवाड), बाबूराव संपत दुधाळ (वय ३० रा. दत्तनगर बामणोली), असिफ अकबर शेख (वय २३, रा. शिवशक्तीनगर, कुपवाड) अशी त्यांची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी सराईत गुन्हेगारांचे तडीपारचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कुपवाड पोलिसांना दिले होते. त्यानुसार सहायक निरीक्षक निरज उबाळे यांनी विशाल निकम, बाबूराव दुधाळ, असिफ शेख, सनी ऊर्फ शुभंम पारसमल जैन (मयत) या चार जणांचे प्रस्ताव मिरजेचे प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविले होते.

प्रांताधिकारी शिंगटे यांनी कुपवाडमधील चार जणांना सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून एका वर्षासाठी तडीपार केले आहे. या चारपैकी सराईत गुन्हेगार सन्या उर्फ शुभम जैन यांचा दि. २३ जानेवारी रोजी कुपवाडमध्ये खून झाला आहे.

सहायक निरीक्षक उबाळे म्हणाले की , हद्दपारीच्या कारवाईमुळे कुपवाड हद्दीतील गुन्हेगारी कमी होणार आहे. यापुढे सतत गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांवर लवकरच तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Tadipar through three two districts in Kupwad