मिरज तालुक्यातील सुतार टोळी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST2021-02-10T04:27:31+5:302021-02-10T04:27:31+5:30
सांगली : मिरज तालुक्यातील लिंगनूर परिसरातील लोकेश सुतार टोळीवर सांगलीसह चार जिल्ह्यांतून तडिपारीची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक दीक्षित ...

मिरज तालुक्यातील सुतार टोळी तडीपार
सांगली : मिरज तालुक्यातील लिंगनूर परिसरातील लोकेश सुतार टोळीवर सांगलीसह चार जिल्ह्यांतून तडिपारीची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
टोळीचा म्होरक्या लोकेश रावसाहेब सुतार (वय २६, रा. लिंगनूर), पपल्या ऊर्फ पपलेश महादेव पाटील (२२, रा. आरग), प्रवीण ऊर्फ सुनील रावसाहेब सुतार (२२, रा. लिंगनूर), सुखदेव ऊर्फ बंड्या हणमंत नाईक (२३, आरग), नागेश उर्फ बाळीशा रावसाहेब सुतार (२१, रा. लिंगनूर) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सुतार टोळी ही २०१६ पासून गंभीर गुन्हे करत आहेत. टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक गेडाम यांनी तडिपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद पाटील यांनी प्रस्ताव तयार केला. अधीक्षक गेडाम यांनी तातडीने मंजुरी देत सांगलीसह सातारा, कोल्हापूर, पुणे या चार जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. कारवाईत अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, प्रवीण वाघमोडे यांचा सहभाग होता.
चौकट
टोळीवर १३ गुन्हे
मिरज ग्रामीण, कवठेमहांकाळ, आष्टा, विटा तसेच तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरी, हत्यार बाळगणे, दरोडा असे गंभीर १३ गुन्हे दाखल आहेत.