जत तालुक्यातील मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:46+5:302021-01-18T04:24:46+5:30
जत : जत तालुक्यातील २९ ग्रामपंचात्तीच्या २४६ सदस्य पदाकरिता १५ जानेवारी रोजी मतदान झाले असून मतमोजणी सोमवार दि. ...

जत तालुक्यातील मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
जत : जत तालुक्यातील २९ ग्रामपंचात्तीच्या २४६ सदस्य पदाकरिता १५ जानेवारी रोजी मतदान झाले असून मतमोजणी सोमवार दि. १८ रोजी तहसीलदार कार्यालय समोरील जुने शासकीय धान्य गोदाम क्रमांक - २ येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
मतमोजणीसाठी एकूण १५ टेबलची रचना करण्यात आली असून यासाठी १५० अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी प्रकियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून उपविभागीय अधिकारी जत विभाग प्रशांत आवटे यांची निवडणूक आयोगाकडून नेमणूक केली आहे.
मतमोजणीच्या एकूण ८ फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पहिल्या फेरीमध्ये - उमराणी, वळसंग , दुसऱ्या फेरीमध्ये - शेगाव, गुगवाड, येळदरी, तिसऱ्या फेरीमध्ये - उटगी, मेंढेगिरी, चौथ्या फेरीमध्ये - अंकले, कुडणूर, अंकलगी, भिवगी, पाचव्या फेरीमध्ये - डोर्ली, धावडवाडी, उंटवाडी, शेडयाळ, सनमडी, सहाव्या फेरीमध्ये - घोलेश्वर, गुड्डापूर, सिध्दनाथ, जाल्याळ खुर्द, करेवाडी (ति.) , सातव्या फेरीमध्ये - तिकोंडी, कुलाळवाडी, मोरबगी, सोनलगी, निगडी बुद्रूक , आठव्या फेरीमध्ये - लमाणतांडा (द.ब.), लमाणतांडा (उटगी) अशी मतमोजणी करण्यात येणार आहे. पोलीस विभागाकडून एक पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, अकरा पोलीस अधिकारी, २१५ पोलीस कर्मचारी व २२५ होमगार्ड असा बंदोबस्त राहाणार आहे.
चाैकट
जमावबंदी लागू
जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे विजयी झालेल्या उमेदवारांना मिरवणूक काढून जल्लोष करता येणार नाही. सर्व उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळित व शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.