‘सिनर्जीने’ वाचविले अडीच वर्षांच्या मुलीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST2021-09-16T04:33:29+5:302021-09-16T04:33:29+5:30
या बालिकेच्या हृदयात ४ मि.मी.चे छिद्र होते. तिचे वजन १२ किलो होते. रविवारी डॉ. मुजावर यांनी केवळ ...

‘सिनर्जीने’ वाचविले अडीच वर्षांच्या मुलीचे प्राण
या बालिकेच्या हृदयात ४ मि.मी.चे छिद्र होते. तिचे वजन १२ किलो होते. रविवारी डॉ. मुजावर यांनी केवळ १५ मिनिटांत बिनटाक्यांची शस्त्रक्रिया करून तिचे हृदयाचे छिद्र बंद करून तिला जीवदान दिले. या शस्त्रक्रियेवेळी वेळी सुप्रसिद्ध सीव्हीटीएस सर्जन डॉ. संजीव वायदंडे, डॉ. पारगावकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. शबाना मुजावर व भूलतज्ज्ञ डॉ. कैलास बरिदे उपस्थित होते.
सिनर्जी
हॉस्पिटलमध्ये लहान मुलावरीलही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. ही
शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात आली. सिनर्जी येथे सर्वसामान्य रुग्णांसाठी जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत. डॉ. मुजावर यांनी अनेक हृदयविकाराच्या रुग्णांवर अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवनदान दिले आहे.
एक वर्षांपूर्वीच सिनर्जी हॉस्पिटलची डॉ .रवींद्र आरळी व प्रसाद जगताप यांनी सुरुवात केली आहे. अल्पावधीतच हॉस्पिटलने अनेक अवघड शस्त्रक्रिया करून अनेकांना जीवनदान दिले आहे. तसेच कोविड काळात २५०० पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत. येणाऱ्या काळात अत्याधुनिक उपचार, जनसामान्य लोकांना महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून उपचार तसेच अत्युच्च रुग्णसेवा भविष्यकाळात देण्याचा मानस आहे, असे हॉस्पिटल व्यवस्थापनाने सांगितले.