कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून तलवार, जांबिया जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:26 IST2021-03-18T04:26:34+5:302021-03-18T04:26:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कुपवाडमध्ये हत्यार घेऊन थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. या ...

कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून तलवार, जांबिया जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कुपवाडमध्ये हत्यार घेऊन थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी इस्माईल सलीम मुजावर (वय २२, रा. कापसे प्लॉट, कुपवाड) व अमन दिलावर शेख (जुना बुधगाव रोड, कुपवाड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, विनायक रामा पाटील हा पसार आहे. त्यांच्याकडून एक तलवार व एक जांबिया असा दीड हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कुपवाड परिसरात गस्तीवर असताना, पथकातील कर्मचारी शशिकांत जाधव यांना माहिती मिळाली की, इस्माईल मुजावर पोत्यांमध्ये दोन तलवारी घेऊन थांबलेला आहे. त्यानुसार मुजावरला ताब्यात घेऊन चाैकशी केली त्यात त्याने मित्र अमन शेख व विनायक पाटील यांच्या मदतीने सूरज काळे याच्या घरातून हत्यारे चोरल्याची माहिती दिली. त्यानुसार उपनिरीक्षक अभिजित सावंत यांनी त्याच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला.