मिरज सिव्हीलमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST2021-02-07T04:25:12+5:302021-02-07T04:25:12+5:30

मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. ठेकेदाराकडून पिळवणूक होत असल्याची ...

Sweepers strike for third day in Miraj Civil | मिरज सिव्हीलमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन

मिरज सिव्हीलमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन

मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. ठेकेदाराकडून पिळवणूक होत असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

मिरज सिव्हीलमधील सफाई कर्मचाऱ्यांना वेतन न देता ठेकेदाराकडून पिळवणूक केली जात असल्याची या कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. सफाई ठेकेदाराविरुद्ध संघर्ष सफाई कर्मचारी व शिवसेनेतर्फे गुरुवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मागणीबाबत तोडगा न निघाल्याने हे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरुच होते. सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने सिव्हील रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. रुग्णालय सफाई ठेकेदार कंपनीने कर्मचाऱ्यांच्या फंडाची रक्कम खात्यावर न भरता परस्पर वापरली आहे. कोरोना काळातील दोन महिन्यांचा पगार दिला नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर सफाई कर्मचारी संघटनेतर्फे कामबंद आंदोलन सुरु आहे.

फाेटाे : ०६ मिरज २

Web Title: Sweepers strike for third day in Miraj Civil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.