सांगलीच्या अपर जिल्हाधिकारी पदी स्वाती देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST2021-09-19T04:26:59+5:302021-09-19T04:26:59+5:30
सांगली : सांगलीच्या अपर जिल्हाधिकारी पदी अखेर डॉ. स्वाती देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा शासनाने दिलेल्या ...

सांगलीच्या अपर जिल्हाधिकारी पदी स्वाती देशमुख
सांगली : सांगलीच्या अपर जिल्हाधिकारी पदी अखेर डॉ. स्वाती देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा शासनाने दिलेल्या आदेशात देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या ही बदल्या झाल्या आहेत. तासगावच्या वादग्रस्त तहसीलदार कल्पना ढवळे यांचीही बदली झाली आहे. अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. सहा महिन्यांहून अधिक काळ या पदावर अधिकाऱ्याची प्रतीक्षा होती. अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होणाऱ्या देशमुख यांनी यापूर्वी सांगलीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम केले आहे.
महसूल उपजिल्हाधिकारी विजया यादव यांची साताऱ्याला बदली झाली असून त्यांच्या जागी मोहिनी चव्हाण यांची नियुक्ती झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांची भुदरगडच्या प्रांताधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांची सातारा येथे बदली झाली. संखचे अपर तहसीलदार जीवन बनसोडे जतचे नवीन तहसीलदार असतील.
तासगावच्या वादग्रस्त तहसीलदार कल्पना ढवळे यांची हातकणंगले येथे बदली झाली आहे. तर वाळव्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांची पुणे जिल्ह्यात बदली झाली आहे. वाळव्याचे तहसीलदार म्हणून प्रदीप उबाळे यांची नियुक्ती झाली.