तानंगच्या महिलेस ‘स्वाइन’ची लागण
By Admin | Updated: September 22, 2015 23:29 IST2015-09-22T22:58:21+5:302015-09-22T23:29:54+5:30
आणखी एक संशयित : उपचार सुरू

तानंगच्या महिलेस ‘स्वाइन’ची लागण
सांगली : तानंग (ता. मिरज) येथील महिलेस स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. मंगळवारी त्या उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, बेळगाव येथील एक संशयित तरुणही दाखल झाला आहे.
तानंगची महिला दिवसापासून ताप, सर्दीने आजारी आहे. त्या खासगी रुग्णालयात औषधोपचार घेत होत्या; पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. प्रकृती खालावत गेली. त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये त्यांना स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मंगळवारी उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. बेळगाव येथील संशयित रुग्णावर तातडीने उपचार सुरु केले आहेत. रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
अहवाल नाही
गेल्या आठवड्यात मृत झालेल्या दोन संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. दररोज स्वाइनचे एक-दोन रुग्ण दाखल होत आहेत.