विद्यार्थी परिषदेतर्फे खंडेराजुरीत स्वामी विवेकानंद जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:31+5:302021-01-24T04:11:31+5:30

खंडेराजुरी येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंती कार्यक्रमात सुनील कुलकर्णी, जयदीप पाटील, राजकुमार गाढवे आदी उपस्थित होते. लोकमत न्यूज नेटवर्क ...

Swami Vivekananda Jayanti in Khanderajuri on behalf of Vidyarthi Parishad | विद्यार्थी परिषदेतर्फे खंडेराजुरीत स्वामी विवेकानंद जयंती

विद्यार्थी परिषदेतर्फे खंडेराजुरीत स्वामी विवेकानंद जयंती

खंडेराजुरी येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंती कार्यक्रमात सुनील कुलकर्णी, जयदीप पाटील, राजकुमार गाढवे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

मालगाव : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील रॉयल प्रिपरेटरी अकादमीमध्ये विद्यार्थी परिषदेच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती साजरी झाली. सांगली आकाशवाणी केंद्रातील कार्यक्रम अधिकारी सुनील कुलकर्णी प्रमुख पाहुणे होते. त्यांनी विवेकानंदांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद हा प्रवास आपल्या भाषणातून विशद केला. परिषदेचे जिल्हा संयोजक जयदीप पाटील यांनी परिषदेच्या वाटचालीची माहिती दिली. प्रत्येक विद्यार्थी देशाच्या जडणघडणीतील घटक असल्याचे मानून परिषदेचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. एकलव्य अकादमीचे शहाजी शिंदे, प्राचार्या गीतांजली शिंदे, मुख्याध्यापक खरात, परिषदेचे जिल्हा संघटन मंत्री राजकुमार गाढवे आदी उपस्थित होते.

-----------

Web Title: Swami Vivekananda Jayanti in Khanderajuri on behalf of Vidyarthi Parishad