‘स्वाभिमानी’चे कराडच्या सह्याद्रीवर गुरुवारी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:28 IST2021-03-23T04:28:36+5:302021-03-23T04:28:36+5:30

कराड येथे सह्याद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांना स्वाभिमानीच्या अ‍ॅड. एस. यू. संदे, देवानंद पाटील, पोपटराव मोरे, दादासाहेब ...

Swabhimani's agitation on Karad's Sahyadri on Thursday | ‘स्वाभिमानी’चे कराडच्या सह्याद्रीवर गुरुवारी आंदोलन

‘स्वाभिमानी’चे कराडच्या सह्याद्रीवर गुरुवारी आंदोलन

कराड येथे सह्याद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांना स्वाभिमानीच्या अ‍ॅड. एस. यू. संदे, देवानंद पाटील, पोपटराव मोरे, दादासाहेब यादव, प्रमोदसिंह जगदाळे यांनी निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : एक रकमी एफआरपीबाबत गुरुवारी, २५ मार्च रोजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखान्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रवक्ते अ‍ॅड. एस. यू. संदे यांनी दिली.

कारखाना कार्यस्थळावर स्व. पी. डी. पाटील यांच्या पुतळ्यासमोर होणाऱ्या या आंदोलनाचे निवेदन कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांना देण्यात आले. यावेळी पोपटराव मोरे, देवानंद पाटील, दादासाहेब यादव, प्रमोदसिंह जगदाळे, रामचंद्र साळुंखे, अजमुद्दीन मुजावर उपस्थित होते.

Web Title: Swabhimani's agitation on Karad's Sahyadri on Thursday