पूरग्रस्तांच्या न्यायासाठी स्वाभिमानी संघर्ष करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST2021-07-29T04:27:06+5:302021-07-29T04:27:06+5:30

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील तांबवे, धोत्रेवाडी या पूरग्रस्त गावांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ...

Swabhimani will fight for the justice of the flood victims | पूरग्रस्तांच्या न्यायासाठी स्वाभिमानी संघर्ष करेल

पूरग्रस्तांच्या न्यायासाठी स्वाभिमानी संघर्ष करेल

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील तांबवे, धोत्रेवाडी या पूरग्रस्त गावांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

यावेळी शेट्टी म्हणाले, २०१९ च्या महापुरावेळी दिली तशी कर्जमाफी आघाडी सरकारने द्यावी. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलेले नाही, त्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार चारपट नुकसान भरपाई मिळाली. महापुरामुळे घरांची पडझड झाली आहे, त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घर बांन धूमिळावे. ज्यांना पूरकाळात घर सोडावे लागले, त्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, अशी आग्रही मागणी सरकारकडे करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करेल.

यावेळी शेट्टी यांच्यासमोर पूरग्रस्त ग्रामस्थांनी आपल्या अडचणी-व्यथा मांडल्या. यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक लिंबाजी पाटील, ब्रम्हानंद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, धोत्रेवाडीच्या सरपंच वनीता माळी, रविकिरण माने, एस्. यु. संदे, संतोष शेळके, भास्कर मोरे, जयवंत पाटील, सदाशिव जाधव, संभाजी जाधव उपस्थित होते.

फोटो : २८ इस्लामपुर १

ओळ :

तांबवे (ता. वाळवा) येथील पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची राजू शेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी लिंबाजी पाटील, ब्रम्हानंद पाटील, भागवत जाधव, रविकिरण माने उपस्थित होते.

Web Title: Swabhimani will fight for the justice of the flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.