शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'स्वाभिमानी'ची १२ ऑक्टोबरपासून सांगली जिल्ह्यात जनआक्रोश पदयात्रा

By अशोक डोंबाळे | Updated: October 2, 2023 18:41 IST

मागील थकबाकी देण्यासह उसाला ४००० दराची मागणी

सांगली : साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामातील थकीत ४०० रुपये आणि चालू गळीत हंगामासाठी प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दि. १२ ऑक्टोबरपासून जनआक्रोश पदयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.महेश खराडे म्हणाले, गणपतीला साकडे घालून गणपती मंदिरापासून गुरुवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. तेथून ही पदयात्रा मिरज येथे जाणार आहे. मालगाव, मल्लेवाडी, बेडगमार्गे दि. १३ रोजी सायंकाळी ५ वाजता मोहनराव शिंदे कारखाना येथे जाणार आहे. एरंडोली, शिपूर, सलगरे, कोंगनोळी, हिंगणगावमार्गे महाकाली कारखान्यावर कवठेमहांकाळ येथे १५ ऑक्टोबर रोजी ४ वाजता यात्रा पोहोचणार आहे. दि. २२ ऑक्टोबर दुपारी २ वाजता उदगिरी कारखान्यावर सभा होणार आहे. दि. २३ रोजी दुपारी ५ वाजता खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील कारखान्यावर यात्रा पोहोचणार आहे. त्यानंतर दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता केन ॲग्रो, दि. २७ ऑक्टोबर रोजी ५ वाजता यात्रा सोनहिरा साखर कारखाना, दि. २९ रोजी ५ वाजता तासगाव कारखाना, दि. १ नोव्हेंबर रोजी क्रांती कारखाना कुंडल यात्रा पोहचणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पदयात्रा दि. १ नोव्हेंबर रोजी कुंडल येथील क्रांती कारखान्यावर एकत्र येणार आहेत. येथून दोन्ही पदयात्रा एकत्रित हुतात्मा, सांगलीतील दत्त इंडिया आणि सर्वोदय कारखान्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती करून ऊस तोडायला द्यावे लागणारे पैसे बंद करणे, साखर उताऱ्यातील चोरी थांबविणे, द्राक्ष बेदाणा महामंडळ स्थापन करावे, दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे, आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनआक्रोश पदयात्रेचा हेतू आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखाने