गणेश फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाला स्वॅब रूम भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST2021-07-01T04:18:41+5:302021-07-01T04:18:41+5:30

आष्टा ग्रामीण रुग्णालयातील स्वॅब टेस्टिंग रूम उद्घाटनप्रसंगी युवक नेते प्रतीक पाटील. सोबत विजय मोरे, स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, विराज ...

Swab room visit to rural hospital on behalf of Ganesh Foundation | गणेश फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाला स्वॅब रूम भेट

गणेश फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाला स्वॅब रूम भेट

आष्टा ग्रामीण रुग्णालयातील स्वॅब टेस्टिंग रूम उद्घाटनप्रसंगी युवक नेते प्रतीक पाटील. सोबत विजय मोरे, स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, विराज शिंदे, माणिक शेळके, शिवाजी चोरमुले, दीपक मेथे, मारुती माने, सतीश माळी, प्रभाकर जाधव, शकील मुजावर, अर्जुन माने उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील श्री गणेश फौंडेशनच्या वतीने आष्टा ग्रामीण रुग्णालयास ॲन्टिजन व आरटीपीसीआर टेस्टसाठी सर्व सोयींनी युक्त स्वॅब कलेक्शन रूम युवक नेते प्रतीक जयंत पाटील यांच्या हस्ते भेट देण्यात आली.

नगरसेवक विजय मोरे म्हणाले, सध्या ग्रामीण रुग्णालयात रोज ५० चाचण्या होत होत्या. त्यांमध्ये वाढ होऊन साधारणत: २०० रोज स्राव व आरटीपीसीआर चाचण्या होतील. नागरिकांचे यामुळे पैसे तर वाचतीलच; शिवाय चाचण्या लवकर झाल्याने नागरिकांना उपचार वेळेवर मिळतील.

यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, डॉ. संतोष निगडी, बी. बी. कांबळे, उपनगराध्यक्ष प्रतिभा पेटारे, विराज शिंदे, रघुनाथ जाधव, दिलीपराव वग्याणी, माणिक शेळके, अर्जुन माने, जगन्नाथ बसुगडे, दीपकराव मेथे-पाटील, प्रभाकर जाधव, सतीश माळी, शकील मुजावर, रामभाऊ अवघडे, शिवाजी चोरमुले, शशिकांत भानुसे, सयाजी गावडे, विराज मोरे, विशाल मोरे, मिलिंद औताडे, श्रीकांत पाटील, अमोल पाटील, पंकज माळी, अमोल कापसे, मारुती माने, ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट

ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संतोष निगडी, बी. बी. कांबळे, सुलताना जमादार यांच्यासह सर्व डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी यांनी कोरोना संकटात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रतीक पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Swab room visit to rural hospital on behalf of Ganesh Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.