शासकीय कामात अडथळाप्रकरणी संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:29 IST2021-02-16T04:29:07+5:302021-02-16T04:29:07+5:30
कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटारवाहन निरीक्षक सागर रेवजी विश्वासराव यांना शिवीगाळ व धमकी ...

शासकीय कामात अडथळाप्रकरणी संशयितास अटक
कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटारवाहन निरीक्षक सागर रेवजी विश्वासराव यांना शिवीगाळ व धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी एका संशयितास अटक केली. ऋषिकेश संतोष व्हनकडे (वय २३, रा. कुपवाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटारवाहन निरीक्षक विश्वासराव व त्यांचे सहकारी मिरज एमआयडीसीत पेट्रोलिंग करीत होते. एका पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावरून एक कार भरधाव वेगाने येत होती. या वाहनाला अडवून विश्वासराव यांनी वाहनचालक ऋषिकेश व्हनकडे यांच्याकडे वाहनाची कागदपत्रे व वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली.
व्हनकडे याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अंगावर धावून गेला. त्याने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी त्यास अटक केली. आज त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. तर, यातील दुसरा संशयित जितेंद्र महादेव व्हनकडे (वय ४०, रा. कुपवाड) यास पोलिसांनी नोटीस बजावली आहे.