सुस्मिता जाधव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:22+5:302021-06-16T04:35:22+5:30

राजारामनगर येथे सुस्मिता जाधव यांचा सत्कार पी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रेणीक कबाडे, एल. बी. ...

Susmita Jadhav felicitated | सुस्मिता जाधव यांचा सत्कार

सुस्मिता जाधव यांचा सत्कार

राजारामनगर येथे सुस्मिता जाधव यांचा सत्कार पी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रेणीक कबाडे, एल. बी. माळी, माणिक शेळके, मेघा पाटील, कमल पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही महिलांचे प्रभावी संघटन करू, असा विश्वास महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनी व्यक्त केला.

राजारामबापू कारखान्याच्या वतीने सुस्मिता जाधव यांचा अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

पी. आर. पाटील म्हणाले, सुस्मिता जाधव या कुशल संघटक, प्रभावी वक्त्या आहेत. त्यांना महिला संघटनांचा मोठा अनुभव आहे. त्या निश्चितपणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मजबूत महिला संघटन उभे करतील.

यावेळी संचालक श्रेणिक कबाडे, एल. बी. माळी, माणिक शेळके, मेघा पाटील, प्रदेश सदस्या कमल पाटील, वैशाली पाटील, युवती शहराध्यक्ष प्रियांका साळुंखे, दिलीपराव खांबे, कारखान्याचे सचिव प्रताप पाटील, सरव्यवस्थापक एस. डी. कोरडे, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील उपस्थित होते.

Web Title: Susmita Jadhav felicitated