सुशिलादेवी संयम, कणखरतेची देवीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:45+5:302021-02-10T04:25:45+5:30
संख : सुशिलादेवी साळुंखे ह्या साक्षात त्यागाची, संयमाची, कणखरतेची देवी होत्या. शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ज्ञान प्रसाराच्या ...

सुशिलादेवी संयम, कणखरतेची देवीच
संख : सुशिलादेवी साळुंखे ह्या साक्षात त्यागाची, संयमाची, कणखरतेची देवी होत्या. शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ज्ञान प्रसाराच्या सामाजिक कार्यात त्या कार्यरत होत्या. गरीब विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्यावर मायेची चादर घातली. लहान वयातच मातृ छत्र हरपलेल्या संस्था मातांनी मात्र सर्वांच्यावर मातृ प्रेमाचा वर्षाव केला. अगदी त्या मुलांच्या राहण्या-खाण्याची सुद्धा व्यवस्था पहात होत्या, असे मत इतिहास विभागप्रमुख प्रा.पुंडलिक चौधरी यांनी व्यक्त केले.
जत येथील राजे रामराव महाविद्यालयात ‘ज्ञान शिदोरी’ कार्यक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. प्रा.अशोक बोगूलवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. हिरामण टोंगारे यांनी आभार केले. प्रा. अतुल टिके यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सांस्कृतिक विभागातील प्रा. सौ. एन. व्ही.मोरे, डॉ. एम. बी. सज्जन, डॉ. बी. एम. डहाळके आदी उपस्थित होते.