शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीला अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी सुशांत खांडेकर, तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:53 IST

सांगली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांच्यासह चार अधिकाऱ्यांची पदोन्नतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी ...

सांगली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांच्यासह चार अधिकाऱ्यांची पदोन्नतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सुशांत खांडेकर यांची नियुक्ती झाली आहे. तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे रिक्त राहिली आहेत.बऱ्याच दिवसांपासून राज्यातील उपजिल्हाधिकारी यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर मंगळवारी राज्यातील सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती मिळाली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांची पदोन्नतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी आंबेजोगाई (जि. बीड) तर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांची धाराशिव येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे.उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त पुनर्वसन आणि उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे यांची पदोन्नतीने पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बदली झाली आहे. सांगलीतील अतिरिक्त जिल्हाधिकारी हे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त होते. या रिक्त जागेवर अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सुशांत खांडेकर यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, पदोन्नतीने गेलेल्या तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे रिक्त राहिल्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे.

कुणाची कुठे झाली बदली?

  • मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे : अतिरिक्त जिल्हाधिकारी आंबेजोगाई (जि. बिड)
  • निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील : अतिरिक्त जिल्हाधिकारी धाराशिव
  • प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे : सहआयुक्त पुनर्वसन विभागीय आयुक्त कार्यालय कोकण.
  • उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे : सहआयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय पुणे.
टॅग्स :Sangliसांगली