धनंजय सोलंकरांना सूर्योदय काव्यभूषण पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:28 IST2021-08-15T04:28:09+5:302021-08-15T04:28:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे कवी धनंजय सोलंकर (रा. गुंडेवाडी, ता. मिरज) यांना राज्यस्तरीय सूर्योदय काव्यभूषण ...

धनंजय सोलंकरांना सूर्योदय काव्यभूषण पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे कवी धनंजय सोलंकर (रा. गुंडेवाडी, ता. मिरज) यांना राज्यस्तरीय सूर्योदय काव्यभूषण पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी जाहीर केला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा जळगाव येथे होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, महाकवी सुधाकर गायधनी, प्रा.डाॅ. म.सु. पगारे, माया दिलीप धुप्पड, प्रा. बी.एन. चौधरी, डाॅ. संजीवकुमार सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार दिनेश दगडकर, सावळीराम तिदमे या निवड समितीने या पुरस्कारांसाठी लेखकांची निवड केलेली आहे. कवी धनंजय सोलंकर यांना राज्यस्तरीय सूर्योदय काव्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून अकरा हजार रोख, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जळगाव येथे जानेवारी २०२२ मध्ये नियोजित पहिल्या अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार प्रदान सोहळा करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी कळविले आहे.