शिराळ्यात जखमी नागावर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:53+5:302021-01-13T05:09:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : बिऊर-शांतीनगर (ता. शिराळा) येथे शेतीचे काम करताना जेसीबी यंत्राच्या फाळाला ...

शिराळ्यात जखमी नागावर शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : बिऊर-शांतीनगर (ता. शिराळा) येथे शेतीचे काम करताना जेसीबी यंत्राच्या फाळाला अडकून रविवारी (दि. १०) गंभीर जखमी झालेल्या नागाचे प्राण शिराळ्यातील युवकांनी वाचविले. नागावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
शेतीचे काम करीत असताना, जेसीबीच्या फाळाला अडकून नाग गंभीर जखमी झाला होता. त्याच्या फण्यास गंभीर दुखापत झाली होती. ही माहिती प्रशांत कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिराळा येथील नागप्रेमी श्रीराम नांगरे-पाटील, गवाणे, ऋत्विक नलावडे, संतोष कदम यांना देऊन जखमी नागास त्यांच्याकडे दिले.
या नागाची माहिती सर्पप्रेमींनी वन खात्याला कळविली. त्याच्यावर तातडीच्या उपचारांची गरज होती. वनक्षेत्रपाल सुशांत काळे व हणमंत पाटील यांनी तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली. डॉ. सुशांत शेणेकर यांनी या जखमी नागावर अर्धा तास शस्त्रक्रिया करून उपचार केले. त्याला वन विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.