सामाजिक कार्याबद्दल सुरेश पाटील यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:43+5:302021-07-07T04:33:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय संचालक ...

सामाजिक कार्याबद्दल सुरेश पाटील यांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय संचालक सुरेश पाटील यांना राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने ‘देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये हा सोहळा पार पडला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून कोरोना साथीने थैमान घातले असताना, सामाजिक बांधिलकीतून पाटील यांनी काम केले. भगवान महावीर कोविड हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी हजारो रुग्णांना उपचार मिळवून दिले. या काळात रक्तदान शिबिर, प्रबोधन, मास्क वाटप, फिरते दवाखाने आदी उपक्रमही त्यांनी राबविले. या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, विवेक गिरधारी, डॉ. पी. एन. कदम आदी उपस्थित होते. संघटनेचे किरण जोशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.