शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश खाडेंनी सांगलीचा मंत्रीपदाचा दुष्काळ संपवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 18:02 IST

उद्योजक ते भाजपचे मंत्री व्हाया रिपाइं

- श्रीनिवास नागे

सांगली : वर्षानुवर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात ‘हेवीवेट’ मंत्रीपदे सांभाळणाऱ्या सांगलीला २०१४ च्या निवडणुकीत चार आमदार निवडून येऊनही भाजपने सुरुवातीला मंत्रीपद दिले नव्हते. नंतर सदाभाऊ खोत यांच्या रूपाने केवळ एक राज्यमंत्रीपद मिळाले. मंत्रीपदाचा हा दुष्काळ संपणार कधी, असा सवाल विचारणाऱ्या सांगली जिल्ह्याला अवघ्या तीन महिन्यांसाठी का होईना सुरेश खाडे यांच्या रूपाने मंत्रीपद मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना खूश केले आहे.

मोजूनमापून पण रोखठोक बोलणे, धूर्तपणा, लोकांची नस ओळखण्यातील चतुराई ही सुरेश खाडे यांची गुणवैशिष्ट्ये. उद्योग-व्यवसायात जम बसलेला असतानाही ते राजकारणात आले. सांगली जिल्ह्यातील जतमधून एकदा आणि आणि मिरज येथून सलग दोनवेळा त्यांनी आमदारकीवर मोहोर उमटवली आहे. 

तासगाव तालुक्यातील पेड हे त्यांचे मूळगाव. जन्म १ जून १९५८ रोजीचा. गरीब चर्मकार कुटुंबात जन्मलेल्या सुरेश खाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत दहावीपर्यंत शिक्षण घेऊन आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला. व्यवसायाच्या शोधात दत्ता व अशोक या भावांसोबत मुंबईला गेले. समुद्रात तेल उत्खनन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीच्या निर्मिती व्यवसायात खाडे बंधूंनी जम बसविला. दास ऑफशोअर या कंपनीची स्थापना केली. दत्ता, अशोक आणि सुरेश या तिन्ही भावांच्या नावांच्या आद्याक्षरावरून ‘दास’चे नामाभिधान झाले.

या कंपनीमार्फत तेल उत्खननासाठी लागणाऱ्या सामग्रीची निर्मिती, स्काय वॉकची उभारणी करण्यात येते. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधण्याचा मान ‘दास’नेच पटकावला आहे. खाडे बंधूंनी दुबईतही उद्योग सुरू केला आहे. 

व्यवसायात यश मिळविल्यानंतर सुरेश खाडे यांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. रिपाइंच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २००४ मध्ये जत राखीव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणुकीची तयारी केली. तेव्हा ते जत येथील डफळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. जतचे तत्कालीन काँग्रेसचे आमदार उमाजी सनमडीकर यांना तत्कालीन काँग्रेस नेते विलासराव जगताप यांनी जोरदार विरोध केला होता. खाडे यांनी जगतापांच्या मध्यस्थीने गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करून जतसाठी भाजपची उमेदवारी मिळविली. जगताप यांनी उघडपणे प्रचार करून खाडे यांना निवडून आणले आणि जिल्ह्यात प्रथमच जतमध्ये भाजपचा आमदार विजयी झाला! 

२००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत जत विधानसभा मतदारसंघ खुला होऊन मिरज मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपने खाडे यांना मिरजेतून उमेदवारी दिली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरजेतूनही खाडे यांनी ५४ हजार मताधिक्याने विजय मिळविला. पुढे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 

शेती, नाटक, संगीत व विठ्ठलभक्ती यात खाडे यांना विशेष रूची. पंढरीच्या प्रत्येक वारीला ते विठ्ठलचरणी हजेरी लावतात. पेड येथील शेतीची, द्राक्षबागेची देखभाल करण्याचीही त्यांना आवड आहे. त्यांचे तासगाव येथे स्वत:चे कोल्ड स्टोअरेज आहे. श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 

विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विरोधात असतानाही खाडे यांनी २००९मधील निवडणुकीपेक्षा दहा हजार जादा मताधिक्याने विजय मिळवला. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या दंगलीमुळे, ‘दंगलीमुळे निवडून आलेला आमदार’ असा विरोधकांनी केलेला प्रचार खोडून काढत त्यांनी एकतर्फी विजय नोंदवला. विरोधातील सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली! दहा वर्षे आमदार म्हणून काम करीत असताना विधिमंडळ समिती सदस्य, पंचायत राज समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले. राष्ट्रीय चर्मकार संघाचे सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत.

दणदणीत विजयसुरेश खाडे यांना विधानभेच्या २०१४मधील निवडणुकीत मिरज मतदारसंघातून ९३७९५ मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रा. सिद्धार्थ जाधव यांना २९७२८ मतांवर समाधान मानावे लागले होते. सुमारे ६४ हजार मतांनी खाडे यांनी दणदणीत विजय मिळवला होता.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार