पेठ येथील सुरेश जाधव यांचा कॉँग्रेस पक्षात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:26 IST2021-04-17T04:26:13+5:302021-04-17T04:26:13+5:30

मुंबई येथे पक्षाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुरेश जाधव यांचा सत्कार केला. लोकमत न्यूज नेटवर्क पेठ ...

Suresh Jadhav from Peth joins the Congress party | पेठ येथील सुरेश जाधव यांचा कॉँग्रेस पक्षात प्रवेश

पेठ येथील सुरेश जाधव यांचा कॉँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई येथे पक्षाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुरेश जाधव यांचा सत्कार केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील रामोशी समाजातील नेते सुरेश ऊर्फ बाळनाना जाधव यांनी आपल्या सहकार्यसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, नितीन राऊत यावेळी उपस्थित होते. जाधव यांचा सत्कार नाना पटोले यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जाधव यांनी रामोशी समाजातील विविध मागणीचे पत्र दिले. यावेळी प्रमुख काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी रामोशी समाजातील न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. चंद्रकांत हाडोरे, महादेव पाटील, अरुण नाना खरमाटे तसेच संघटनेचे विवेक गुरव, गजेंद्र गवळी, वैभव गुरव, विशाल पाटील, रोहन जाधव उपस्थित होते.

Web Title: Suresh Jadhav from Peth joins the Congress party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.