सुरेश बिरादार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST2021-06-02T04:21:01+5:302021-06-02T04:21:01+5:30
फोटो संख : वज्रवाड (ता. जत) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश महादेव बिरादार ...

सुरेश बिरादार
फोटो
संख : वज्रवाड (ता. जत) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश महादेव बिरादार (वय ४५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मूळ गाव भिवर्गी (ता. जत) असून २०१६ मध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक म्हणून त्यांची निवड झाली. सध्या ते अध्यक्षपदावर कार्यरत होते. सभासद शिक्षक मृत झाल्यास त्यांंचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बिळूर केंद्राचे १० वर्षे प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून काम केले. त्यांना पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. विविध गावांत नवीन शाळांचे बांधकाम त्यांच्या पुढाकाराने झाले. विद्यार्थीप्रिय शिक्षक असा त्यांचा लौकिक होता. शांत, मनमिळावू, संयमी, कार्यकुशल स्वभावाचे शिक्षक म्हणून ते परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, विवाहित बहीण असा परिवार आहे.