सुप्रिया सुळे यांची 'पदयात्री' स्मरकास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:27 IST2021-01-25T04:27:04+5:302021-01-25T04:27:04+5:30

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 'पदयात्री' स्मरकास खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन ...

Supriya Sule's visit to 'Padayatri' memorial | सुप्रिया सुळे यांची 'पदयात्री' स्मरकास भेट

सुप्रिया सुळे यांची 'पदयात्री' स्मरकास भेट

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 'पदयात्री' स्मरकास खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन बापूच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्मारकाची पाहणी करून बापूंचे दुर्मिळ फोटो पाहून माहिती घेतली.

खासदार सुप्रिया सुळे या आपल्या नियोजित दौऱ्यानिमित कोल्हापूरकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांचा ताफा कासेगावमध्ये थांबून पदयात्री स्मरकास भेट दिली. यावेळी त्यांनी बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

सरपंच किरण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रतीक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, उदय पाटील, उपसरपंच दाजी गावडे, प्रा. कृष्णा मंडले, अमृत पाटील, सुजित पाटील, सुभाष आडके, विलास पाटील, आण्णा माने, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

फोटो-२३कासेगाव१

Web Title: Supriya Sule's visit to 'Padayatri' memorial