जत तालुक्यात पाेलिसांकडून अवैध धंद्यांना पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:02+5:302021-04-11T04:25:02+5:30

जत : जत तालुक्यात कोरोना कालावधीत अवैध धंद्यांना चाप लावण्याऐवजी पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. मटका, ...

Support for illegal trades from Paelis in Jat taluka | जत तालुक्यात पाेलिसांकडून अवैध धंद्यांना पाठबळ

जत तालुक्यात पाेलिसांकडून अवैध धंद्यांना पाठबळ

जत : जत तालुक्यात कोरोना कालावधीत अवैध धंद्यांना चाप लावण्याऐवजी पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. मटका, जुगार व सावकारीला आर्थिक तडजोडीतून पाठबळ दिले जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर व्यवसायांवर तत्काळ कारवाई करावी; अन्यथा जत तालुका भाजपच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू, असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत दिला.

जगताप म्हणाले, मटका, जुगार व खासगी सावकारीचा व्यवसाय जत शहरासह तालुक्यात खुलेआम सुरू आहे. पोलिसांच्या सहकार्याने खासगी सावकार मनमानी व्याज आकारणी करून जनतेला लुटत आहेत. अवैध व्यावसायिकांना पोलीस अधिकारी व कर्मचारी पाठीशी घालत आहेत. खासगी प्रवासी वाहतूक, वाळू, गावठी दारू, मटका, जुगार, इत्यादी प्रत्येक विभागाला पोलीस अधिकाऱ्यांनी वसुली बहाद्दरांची नेमणूक केली आहे. नियमानुसार प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या लोकांना नाहक त्रास देऊन अवैध व्यावसायिकांना मोकळे सोडले जात आहे. अवैध व्यवसायिकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. आमदार विक्रम सावंत यांनी हिवाळी विधानसभा अधिवेशनात अवैध धंद्याबाबत आवाज उठविला होता. त्यानंतर तालुक्यातील अवैध धंदे बंद होण्याऐवजी त्यांत वाढच झाली आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. त्याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत नाही. दैनंदिन कामापेक्षा इतर कामांत पोलीस अधिकारी व्यस्त असतात, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Web Title: Support for illegal trades from Paelis in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.