आष्ट्यातील केळी सौद्यामुळे शेतकऱ्यांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:13+5:302021-03-24T04:25:13+5:30
आष्टा : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आष्टा येथे सुरू केलेल्या उपबाजारात हळदीला भाव मिळत आहे. या ठिकाणी केळीचे ...

आष्ट्यातील केळी सौद्यामुळे शेतकऱ्यांना आधार
आष्टा : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आष्टा येथे सुरू केलेल्या उपबाजारात हळदीला भाव मिळत आहे. या ठिकाणी केळीचे सौदे सुरू करीत केळी उत्पादकांना आधार देण्याचे काम बाजार समितीने केले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी नवीन बाजारपेठ निर्माण केली आहे असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
आष्टा येथे मंगळवारी जयंत पाटील यांच्या हस्ते केळीचे सौदे सुरू करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे, झुंजारराव पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, वैभव शिंदे, संभाजी कचरे, श्रीकांत कबाडे, विराज शिंदे, माणिक शेळके, रमेश हाके, बाजार समितीचे सभापती अल्लाउद्दीन चौगुले, बाळासाहेब इंगळे, दत्तात्रय मस्के, ॲड. विश्वासराव पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले नवे कायदे आपल्या मर्यादा स्पष्ट करीत आहेत. शेतकऱ्यांसाठीची शाश्वत व्यवस्था अनेक वर्षे चालू आहे. ती पारदर्शी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. शेतकऱ्यांच्या मालाची विक्री त्यांच्यासमोर होत आहे. हळद व केळीचे सौदे मार्केट कमिटीच्या वतीने होत असल्याने व ती जबाबदारी घेत असल्याने या देशात नव्याने निर्माण होणाऱ्या व्यवस्थेवर लोकांचा अद्याप विश्वास नाही. पारंपरिक बाजार समितीने पारदर्शी कारभार करून लोकांचा विश्वास कायम राखावा.
यावेळी शिवाजी चोरमुले, धैर्यशील शिंदे, सतीश माळी, बाजीराव पाटील, संभाजी माळी, रामचंद्र सिद्ध, विजय मोरे, विजय जाधव, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, अर्जुन माने, प्रभाकर जाधव, व्ही. डी. पाटील, निवास गावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अल्लाउद्दीन चौगुले यांनी स्वागत केले. विजय जाधव यांनी आभार मानले.
चौकट:
देशी केळीला २१ हजार दर
भूपाल झिनगे यांच्या देशी केळीला २१ हजार रुपये, तर पांडुरंग काळे व अमित कदम यांच्या संकरित जी नाईन केळीला १२ हजार ९०० रुपये, सागर पाटील यांच्या केळीला ९ हजार रुपये प्रति टन दर मिळाला. एकूण देशी केळी २ टन, तर जी नाईन केळी २५ टन आवक झाली. प्रत्येक सोमवारी व गुरुवारी केळीचे सौदे सुरू राहणार आहेत.
फोटो : २३ आष्टा १
ओळ : आष्टा येथे केळी सौद्याचे उद्घाटन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी झुंजारराव शिंदे, झुंजारराव पाटील, स्नेहा माळी, वैभव शिंदे, विराज शिंदे, माणिक शेळके, अल्लाउद्दीन चौगुले, बाजीराव पाटील, बाळासाहेब इंगळे, निवास गावडे, विजय जाधव उपस्थित हाेते.