शिरसटवाडीत निराधार मुलींना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:43+5:302021-02-10T04:25:43+5:30
कोकरुड : शिरसटवाडी (ता. शिराळा) येथील निराधार दोन मुलींना कृपासिंधू ट्रस्टच्या वतीने आर्थिक मदत म्हणून कन्यादान योजनेअंतर्गत ठेव ठेवण्यात ...

शिरसटवाडीत निराधार मुलींना आधार
कोकरुड : शिरसटवाडी (ता. शिराळा) येथील निराधार दोन मुलींना कृपासिंधू ट्रस्टच्या वतीने आर्थिक मदत म्हणून कन्यादान योजनेअंतर्गत ठेव ठेवण्यात आली. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.
शिरसटवाडी येथील युवक विकास शिरसट आणि त्याच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या बालवाडीत शिक्षण घेणाऱ्या श्रेया विकास शिरसट व लावण्या विकास शिरसट या दाेन मुली निराधार झाल्या होत्या. या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कृपासिंधू ट्रस्टने घेतली आहे. या दोन निराधार मुलींच्या नावे मुंबई येथील शिवराज सहकारी पतसंस्था व श्री गोरक्षनाथ नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेत ‘कन्यादान ठेव’ योजनेत ठेव ठेवण्यात आली असून त्यांना त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी व्याजासह मुद्दल देण्यात येणार आहे. तसेच शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. याकामी ट्रस्टचे विश्वस्त मारुती शिरसट व लक्ष्मण खटिंग यांनी पुढाकार घेतला. या वेळी बापू शिरसट, महेश शिरसट, तानाजी शिरसट या मान्यवरांच्या हस्ते मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमास माजी उपसरपंच जोतिराम शिरसट, शिवाजी शिरसट, मुख्याध्यापक सदाशिव पाटील, सुनील मोहिते उपस्थित होते.
फाेटाे : ०९ काेकरुड २
ओळ : शिरसटवाडी (ता. शिराळा) येथील निराधार बालिकांना मारुती शिरसट, तानाजी शिरसट, जोतिराम शिरसट, सुनील मोहिते यांनी मदत देऊ केली.