सहकार वाचविण्यासाठीच सहकार पॅनेलला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:29 IST2021-05-25T04:29:47+5:302021-05-25T04:29:47+5:30

शिरटे : सहकार वाचला पाहिजे, टिकला पाहिजे आणि सहकारातून सभासदांची समृद्धी झाली पाहिजे, या विचाराने कृष्णाचे अध्यक्ष डॉ. सुरेश ...

Support the cooperation panel only to save the cooperation | सहकार वाचविण्यासाठीच सहकार पॅनेलला साथ

सहकार वाचविण्यासाठीच सहकार पॅनेलला साथ

शिरटे : सहकार वाचला पाहिजे, टिकला पाहिजे आणि सहकारातून सभासदांची समृद्धी झाली पाहिजे, या विचाराने कृष्णाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुक्यातील बहुतांशी कार्यकर्ते हे सहकार पॅनेलच्या बाजूने आहेत, असे प्रतिपादन जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश देसाई यांनी सांगितले.

देसाई म्हणाले, डॉ. भोसले यांच्या कारकीर्दीमध्ये सर्वच संस्था उत्तम रितीने चालू आहेत. सभासदांच्या कुटुंबांना रोजगार मिळून त्यांचा जीवनात समृद्धी आली आहे. सहकार वाचवायचा, टिकवायचा असेल तर, डॉ. सुरेश भोसले यांच्याशिवाय पर्याय नाही. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सातत्याने चांगला ऊसदर दिला आहे. सभासदांना मोफत साखर दिली जाते. सभासद हिताचे निर्णय घेतले जातात. म्हूणनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहकार पॅनेलच्या बरोबर असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Support the cooperation panel only to save the cooperation