शिधापत्रिकेवरील धान्य पुरवठा करा, अन्यथा आंदोलन
By Admin | Updated: February 4, 2015 00:02 IST2015-02-03T23:19:04+5:302015-02-04T00:02:16+5:30
राष्ट्रवादीचा इशारा : इस्लामपुरात तहसीलदारांना निवेदन

शिधापत्रिकेवरील धान्य पुरवठा करा, अन्यथा आंदोलन
इस्लामपूर : भाजप-शिवसेना युतीच्या केंद्र व राज्य शासनाने पूर्वीप्रमाणे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त धान्य पुरवठा सुरू करून रॉकेलचा कोटा पूर्ववत करावा़, अन्यथा गोर-गरिबांच्या तोंडातील घास काढून घेणाऱ्या शासनाविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मंगळवारी देण्यात आला़ संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार सौ. आर. पी. बिचकर यांच्याकडे पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले़ तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील म्हणाले, पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार गोरगरीब कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य पुरवठा करीत होते़ हे धान्य वाटणे आता बंद केले आहे़ हे शासन लोकांविरोधी काम करीत असून, ते आम्ही खपवून घेणार नाही.युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, युती शासनाने रॉकेल कोट्यात ७२ टक्क्यापर्यंत कपात केली आहे़ ती त्यांनी पूर्ववत करावी अन्यथा गोर-गरिबांच्या रोषाला सामोरे जावे लागेल़ जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, पंचायत समिती सभापती रवींद्र बर्डे, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी,जिल्हा उपाध्यक्ष विष्णूपंत शिंदे, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव यांनी शासनास तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला़ माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक शहराध्यक्ष खंडेराव जाधव, माजी नगराध्यक्ष अॅड़ चिमण डांगे, बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील, उपसभापती सुरेश गावडे, सौ़ सुनीता देशमाने, सौ़ रोझा किणीकर, रफिक तांबोळी, शैलेंद्र सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, विराज शिंदे, डॉ़ अशोक पाटील, एस़ आऱ पाटील उपस्थित होते. शहाजीबापू पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)