भिलवडी जायंट्स ग्रुपचे सुनील परीट अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST2021-07-20T04:19:38+5:302021-07-20T04:19:38+5:30

भिलवडी : भिलवडी जायंट्स ग्रुपचा पदग्रहण व शपथविधी समारंभ झाला. मुंबई मध्यवर्ती समितीचे सदस्य डॉ. सतीश बापट, उद्योगपती गिरीश ...

Sunil Parit President of Bhilwadi Giants Group | भिलवडी जायंट्स ग्रुपचे सुनील परीट अध्यक्ष

भिलवडी जायंट्स ग्रुपचे सुनील परीट अध्यक्ष

भिलवडी : भिलवडी जायंट्स ग्रुपचा पदग्रहण व शपथविधी समारंभ झाला. मुंबई मध्यवर्ती समितीचे सदस्य डॉ. सतीश बापट, उद्योगपती गिरीश चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष सुनील परीट, उपाध्यक्ष पार्श्वनाथ चौगुले, सुधीर गुरव, कार्यवाह संतोष जाधव, सहकार्यवाह गैबीसाहेब शेख, खजिनदार संजय अंबी या कार्यकारिणी सदस्यांना सनतकुमार पाचोरे यांनी शपथ दिली. सीरम इन्स्टिट्यूट (पुणे) येथील कोविशिल्ड लसनिर्मिती संस्थेत निवड झाल्याबद्दल चिन्मय कुलकर्णी यांचा गिरीश चितळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. के. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. जयकुमार चोपडे, राजेंद्र कुलकर्णी, भगवान शिंदे, डी. आर. कदम, सतीश चौगुले, डॉ. सी. व्ही. कुलकर्णी, प्रदीप शेटे आदी उपस्थित होते.

190721\img-20210719-wa0268.jpg

भिलवडी जायंट्स चे अध्यक्ष सुनिल परीट यांना शपथ देताना सनदकुमार पाचोरे,उद्योजक गिरीश चितळे, डॉ.सतीश बापट आदी मान्यवर.

Web Title: Sunil Parit President of Bhilwadi Giants Group