सुनील माने यांना मिळालेला पुरस्कार प्रेरक : सचिन ढोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:45+5:302021-04-04T04:27:45+5:30
आष्टा : आष्टा येथील सुनील माने यांनी ऊस, केळी, हळद, भाजीपाला यासह पपई व विविध फुलांची लागवड करीत शेतकऱ्यांसमोर ...

सुनील माने यांना मिळालेला पुरस्कार प्रेरक : सचिन ढोले
आष्टा : आष्टा येथील सुनील माने यांनी ऊस, केळी, हळद, भाजीपाला यासह पपई व विविध फुलांची लागवड करीत शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांना मिळालेला कृषिभूषण पुरस्कार शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा ठरेल असे प्रतिपादन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.
आष्टा येथील प्रगतिशील शेतकरी सुनील माने यांना महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना प्रांताधिकारी सचिन ढोले बोलत होते. यावेळी एन. डी. कुलकर्णी, डॉ. मनोहर कबाडे, डॉ. आर. एस. चौगुले, रमेश कदम, दत्तात्रय मस्के, डॉ. अनिल निर्मळे, महावीर थोटे, छोटू किनिंगे उपस्थित होते.
फोटो : ०३ आष्टा ३
ओळ : आष्टा येथील सुनील माने यांचा कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, डॉ. मनोहर कबाडे, एन. डी. कुलकर्णी यांनी सत्कार केला.