शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

मुलीच्या अपहरणप्रकरणी सराईत गुंडास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:04 PM

सांगली : विश्रामबाग परिसरात घरात घुसून अल्पवयीन मुलीची आई व भावावर हल्ला करुन मुलीचे अपहरण करणाऱ्या टोळीचा म्होरक्या चेतन ऊर्फ चैतन्य राजाराम नाईक (वय २४, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली) यास पनवेल (जि. रायगड) येथे अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना बुधवारी रात्री यश आले. या अपहरणप्रकरणी एकूण सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. ...

सांगली : विश्रामबाग परिसरात घरात घुसून अल्पवयीन मुलीची आई व भावावर हल्ला करुन मुलीचे अपहरण करणाऱ्या टोळीचा म्होरक्या चेतन ऊर्फ चैतन्य राजाराम नाईक (वय २४, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली) यास पनवेल (जि. रायगड) येथे अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना बुधवारी रात्री यश आले. या अपहरणप्रकरणी एकूण सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. आतापर्यंत चौघांना अटक झाली आहे.चेतन नाईकसह मनोज वसंत पोरे (३१), सुमित मारुती सिंदगे (१९), तनील राजाराम नाईक (२२, तिघे रा. जुना बुधगाव रस्ता, वाल्मिकी आवास, सांगली) हे चौघे अटकेत आहेत. तसेच अजय बापू कांबळे व पवन धर्मेंद्र साळुंखे यांना अजून अटक केलेली नाही. कांबळे हा जखमी असल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे, तर साळुंखे शहर पोलिसांच्या एका गुन्ह्यात कारागृहात आहे. त्यांच्याविरुद्ध अपहरण, जबरदस्तीने घरात प्रवेश करणे व बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.संशयितांनी ९ मार्च २०१८ रोजी मोटार (क्र. एमएच-११-एके-५८०२) व दुचाकीवरुन येऊन पीडित मुलीच्या घरात प्रवेश केला. मुलीच्या आईला बेदम मारहाण केली. मुलीला घरातून ओढून जबरस्तीने गाडीत आणून बसविले. मुलीच्या बहिणीने गाडी अडविण्याचा प्रयत्न केला, पण संशयितांनी तिच्या अंगावर गाडी घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. चाकू व तलवार घेऊन ते तिच्या अंगावर गेले होते.या घटनेनंतर मुलीच्या बहिणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन विश्रामबाग पोलिसांना तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले होते.पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, गुन्हे प्रगटीकरण शाखेचे उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस नाईक अमोल ढोले, ऋतुराज होळकर व मल्लाप्पा कट्टीमणी यांनी तांत्रिक पद्धतीने याचा तपास केला. त्यावेळी चेतन नाईक हा मुलीस घेऊन पनवेल येथे आश्रयाला असल्याची माहिती मिळाली. बुधवारी मध्यरात्री हे पथक पनवेलमध्ये दाखल झाले होते.पनवेल तालुक्यातील दुंडरे, वाकडी, वांजे, चिंचवली भागात त्यांनी शोध घेतला. वांजे गावात शेलार बिल्डर यांच्या प्लॉटवर दोनशे खोल्या असल्याचे दिसून आले. पण यातील केवळ वीस खोल्यांत भाडेकरु असल्याची माहिती मिळाली. सर्व खोल्यांत तपासणी केल्यानंतर एका खोलीत चेतन नाईक हा संबंधित मुलीसह सापडला.टोळीविरुध्द गंभीर गुन्हेमुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल असलेली चेतन नाईक याची टोळी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. त्यांच्याविरूध्द मारामारी, हत्यार बाळगणे, चोरी, अपहरण, असे गंभीर गुन्हे सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल आहेत.