महादेव बुरुटे यांच्या चार पुस्तकांचे रविवारी प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:30 IST2021-08-25T04:30:52+5:302021-08-25T04:30:52+5:30

जत : शेगाव (ता. जत) येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी महादेव बुरुटे यांच्या ‘पिंपळवन डॉट कॉम’ या बालकादंबरीचे प्रकाशन प्रसिद्ध ...

Sunday publication of four books by Mahadev Burute | महादेव बुरुटे यांच्या चार पुस्तकांचे रविवारी प्रकाशन

महादेव बुरुटे यांच्या चार पुस्तकांचे रविवारी प्रकाशन

जत : शेगाव (ता. जत) येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी महादेव बुरुटे यांच्या ‘पिंपळवन डॉट कॉम’ या बालकादंबरीचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संपतराव जाधव यांच्या हस्ते रविवार, २९ राेजी शेगाव येथे होणार आहे.

मराठी साहित्य सेवा मंच, शेगावचे २४ वे ग्रामीण साहित्य संमेलन रविवारी चिंच विसावा, शेगाव येथे दुपारी ३ ते ६ या वेळेत होत आहे. संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. जाधव यांच्या हस्ते या बहुचर्चित बालकादंबरीचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. याच वेळी बुरुटे यांच्या ‘गुलमोहोर आणि इतर बालकविता, ‘मुले फुले शब्दझुले’, ‘भुताचं झाड’ या तीन बालसाहित्य पुस्तकांचे व शेतीविषयक ‘शेतकळा’ या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. कवी महादेव बुरुटे हे दोन्ही पायांनी पूर्णतः दिव्यांग असून, त्यांची अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Web Title: Sunday publication of four books by Mahadev Burute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.