सुमनतार्इंचा विजय हीच आबांना श्रद्धांजली
By Admin | Updated: March 30, 2015 00:14 IST2015-03-29T23:33:06+5:302015-03-30T00:14:41+5:30
जयंत पाटील : ‘तासगाव-कवठेमहांकाळ’ पोटनिवडणूक; ढवळीतून राष्ट्रवादीच्या प्रचारास प्रारंभ

सुमनतार्इंचा विजय हीच आबांना श्रद्धांजली
तासगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्यापुढे निवडणुकीत कोण उभे आहे, याचा विचार न करता प्रत्येकाने आपणच उमेदवार असल्याचे समजून सुमनतार्इंना विक्रमी मतांनी निवडून आणून आबांना श्रद्धांजली वाहू, असे आवाहन माजी मंत्री जयंत पाटील यांनी ढवळी (ता. तासगाव) येथे केले.तासगाव-कवठेमहांकाळच्या पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ आज ढवळीत करण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते. जिल्ह्यातील प्रमुख नेते याप्रसंगी उपस्थित होते. माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सुमनताई पाटील यांच्या पाठीशी सजगतेने राहणे गरजेचे आहे. आर. आर. आबांचे कार्य डोळ्यापुढे ठेवून कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हाती घ्यावी. आबांचे कर्तृत्व, कार्य मोठे होते. त्यामुळे इतर राजकीय पक्षांनी या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. आबांच्या कर्तृत्वाला साजेसे कार्य या निवडणुकीत कार्यकर्त्यांना करायचे आहे. आबांनी त्यांची कारकीर्द मतदारसंघाच्या विकासासाठीच खर्ची घातली. सुमनतार्इंना विक्रमी मतांनी निवडून आणून आबांना श्रद्धांजली वाहू, असे ते म्हणाले.काँग्रेसचे नेते मोहनराव कदम म्हणाले की, या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार नसणार हे आधीच स्पष्ट केले होते. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने सुमनतार्इंच्या पाठीशी राहणार आहेत. माजी आमदार प्रकाश शेंडगे, डी. के . काका पाटील, बजरंग पाटील, विशाल पाटील, छाया खरमाटे, ताजुद्दीन तांबोळी यांची भाषणे झाली.यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, विलासराव शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, दिलीप पाटील, योजना शिंदे, स्मिता पाटील, सभापती हर्षला पाटील, उपसभापती विश्वास पाटील, सुरेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
आरेवाडीत बिरोबाचे दर्शन
आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज श्री बिरोबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हायूम सावनूरकर, महांकालीचे संचालक कोंडीबा पाटील, जालिंदर देसाई, चंद्रकांत हाक्के, तम्माण्णा घागरे, शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, शिवाजीराव कोळेकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष कोंडीबा कोळेकर, रामचंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, कुमार पाटील, संजय पाटील, एन. टी. कोळेकर, शंकर कोळेकर, दत्ता माळी, पोपट शिंदे, सुभाष खांडेकर आदी उपस्थित होते.