जालिहाळ खुर्द सरपंचपदी सुमन भीमराव माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST2021-02-20T05:17:37+5:302021-02-20T05:17:37+5:30

संख : जालिहाळ खुर्द (ता. जत) येथील सरपंचपदी सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीच्या सुमन भीमराव माने, तर उपसरपंचपदी लता दऱ्याप्पा ...

Suman Bhimrao Mane as Jalihal Khurd Sarpanch | जालिहाळ खुर्द सरपंचपदी सुमन भीमराव माने

जालिहाळ खुर्द सरपंचपदी सुमन भीमराव माने

संख : जालिहाळ खुर्द (ता. जत) येथील सरपंचपदी सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीच्या सुमन भीमराव माने, तर उपसरपंचपदी लता दऱ्याप्पा गोदे यांची बिनविरोध निवड झाली. गावात प्रथमच महिलाराज आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल. एल. भडके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बी. के. कोकरे यांनी काम पाहिले.

पूर्व भागातील जालिहाळ खुर्द येथे गेल्या ५५ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होते. यावर्षी प्रथमच निवडणूक झाली. गावपातळीवर काँग्रेस, भाजप या पक्षांनी एकत्र येत जय हनुमान विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. सहा जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये आघाडीने मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळविला. लता गोदे या बिनविरोध निवडून आल्या.

सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. गावपातळीवर बैठक होऊन सरपंचपदी सुमन माने, तर उपसरपंचपदी लता गोदे यांची निवड झाली. नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार एल. एल. भडके यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी कामाण्णा पाटील, राजू डफळे, लाह्याप्पा बिराजदार, बाजीराव चव्हाण, संभाजी जावीर, कमळाबाई शिंदे, निलाबाई पाटील, जयवंत पाटील, बिराप्पा बिराजदार, मनोहर पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Suman Bhimrao Mane as Jalihal Khurd Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.