सुलोचना भट औद्योगिक प्रशिक्षण संस्था ग्रामीण भागासाठी वरदान : अरुण लाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST2021-08-22T04:29:35+5:302021-08-22T04:29:35+5:30
कुंडल (ता. पलूस) येथील श्रीमती सुलोचना भट महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लाड म्हणाले, वाढत्या ...

सुलोचना भट औद्योगिक प्रशिक्षण संस्था ग्रामीण भागासाठी वरदान : अरुण लाड
कुंडल (ता. पलूस) येथील श्रीमती सुलोचना भट महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लाड म्हणाले, वाढत्या औद्योगिकरणामुळे तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेतलेल्या मनुष्यबळाची गरज भासत आहे. यासाठी प्रस्थापित उद्योजकांनी प्रात्यक्षिक ज्ञान देणाऱ्या संस्थांबरोबर सामंजस्य करार करून कुशल मनुष्यबळ तयार करून देशाच्या विकासाला हातभार लावावा. ॲड. प्रकाश लाड यांनी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या स्वप्नातील आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा युवक बनवण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे.
या संस्थेत सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून युवतींसाठी संगणक ऑपरेटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅकॅनिकल ड्राफ्ट्समन, तर युवकांसाठी इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग अशा अभ्यासक्रमाचा समावेश आहे. अत्याधुनिक संगणक, एम. एस. ऑफिस, आयटी व कोपा लॅबमधील साऊंड फोर्ज, स्टेलर डाटा रिकव्हरी, क्रिटिव्ह क्लाऊड, कोरल ड्रॉ हे सर्व संगणक अभ्यासक्रम ऑटोकॅड २०२० सॉफ्टवेअरयुक्त आहे. वेल्डिंगसाठी जर्मन तंत्रज्ञानाच्या मशीनद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे सर्व शिकवण्यासाठी अनुभवी निर्देशकांची नेमणूक केली आहे.
या अभ्यासक्रमावेळी संबंधित आस्थापनांना भेटी, तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन, कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नोकरीची संधी दिली जाणार आहे. गरजू व हुशार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण शुल्कात सवलत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.