सांगलीत युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST2021-03-16T04:28:00+5:302021-03-16T04:28:00+5:30
सांगली : शहरातील जुना कुपवाड रोडवरील महात्मा गांधी कॉलनीमध्ये राहणार्या युवकाने घरातील छताच्या हुकला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. ...

सांगलीत युवकाची आत्महत्या
सांगली : शहरातील जुना कुपवाड रोडवरील महात्मा गांधी कॉलनीमध्ये राहणार्या युवकाने घरातील छताच्या हुकला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. ऋषिकेश शिशिर कपुरे (वय १८) असे मृताचे नाव असून, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संजयनगर पोलिसात या घटनेची नोंद आहे.
ऋषिकेश हा महात्मा गांधी कॉलनीत कुटुंबियांसह राहात होता. तो शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत होता. सोमवारी दुपारी त्याचे वडील, भाऊ, बहीण बाहेर गेले होते तर आई कामात होती. याचदरम्यान त्याने बेडरूममधील छताच्या हुकाला साडीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.