मिरजेत ट्रेनिग सेंटरमध्ये तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST2021-04-12T04:25:01+5:302021-04-12T04:25:01+5:30
मिरज : मिरजेत बाजार समिती आवारातील एका इमारतीत असलेल्या फॅशन डिझायनिंग ट्रेनिग सेंटरमध्ये दीपाली बाळासाहेब कलगुटगी (वय २७ रा. ...

मिरजेत ट्रेनिग सेंटरमध्ये तरुणीची आत्महत्या
मिरज : मिरजेत बाजार समिती आवारातील एका इमारतीत असलेल्या फॅशन डिझायनिंग ट्रेनिग सेंटरमध्ये दीपाली बाळासाहेब कलगुटगी (वय २७ रा. माधव पेठ मिरज) या तरुणीने गळफास आत्महत्या केली. खोलीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आत्महत्येचे चित्रण झाले आहे
मार्केट यार्ड परिसरातील सेजल व्हाेकेशनल ट्रेनिग इन्स्टिट्यूट या फॅशन डिझायनिंग ट्रेनिग सेंटरमध्ये दीपाली प्रशिक्षक म्हणून काम करत हाेती. या इन्स्टिट्युटमध्येच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ४ वाजता हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. दीपाली इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन डिझाईन शिकवित होती. रविवारी सुटी असल्याने ती एकटीच येथे हाेती. दुपारी तिने छताच्या पंख्याला दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. गांधी चौक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. दीपाली आत्महत्या करताना खोलीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रण झाले आहे. पोलिसांनी चित्रण ताब्यात घेऊन आत्महत्येच्या कारणाची चाैकशी सुरू केली आहे.