विटा येथे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:55+5:302021-01-13T05:09:55+5:30

विटा : राजू रामचंद्र कुराडे (वय ३२, रा. आयटीआय कॉलेजजवळ, साळशिंगे रोड, विटा) या तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास ...

Suicide of a young man at Vita | विटा येथे तरुणाची आत्महत्या

विटा येथे तरुणाची आत्महत्या

विटा : राजू रामचंद्र कुराडे (वय ३२, रा. आयटीआय कॉलेजजवळ, साळशिंगे रोड, विटा) या तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

राजू कुराडे हा वाहनचालक म्हणून काम करीत होता. त्याच्या कुटुंबातील अन्य लोक बांधकाम मजूर म्हणून काम करतात. सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास राजूने घरातील तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून, हवालदार एम. टी. मल्याळकर पुढील तपास करीत आहेत.

फोटो- १२०१२०२१-विटा-राजू कुराडे, विटा. (मयत).

Web Title: Suicide of a young man at Vita