मिरजेतील तरुण बेदाणा व्यापाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:31+5:302021-08-14T04:31:31+5:30

मिरज : यशोधन मोरेश्वर खाडिलकर (वय ३०, रा. ब्राम्हणपुरी, मिरज) या तरुण बेदाणा व्यापाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी शहर पोलिसांनी जत व ...

Suicide of a young currant trader in Miraj | मिरजेतील तरुण बेदाणा व्यापाऱ्याची आत्महत्या

मिरजेतील तरुण बेदाणा व्यापाऱ्याची आत्महत्या

मिरज : यशोधन मोरेश्वर खाडिलकर (वय ३०, रा. ब्राम्हणपुरी, मिरज) या तरुण बेदाणा व्यापाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी शहर पोलिसांनी जत व उमदीतील व्यापाऱ्यांसह नऊजणांवर गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायात तोटा झाल्यानंतर पैसे वसुलीसाठी दमदाटी व मारहाण केल्याने यशोधनने आत्महत्या केल्याची फिर्याद त्याच्या आईने शहर पोलिसात दिली आहे.

याबाबत चाैकशी केल्यानंतर श्रीशैल बिराजदार, महादेव शेवाळे, मलगोंड लोणी, मलकारी लोणी, सिद्धराज धुहगोंड, घेणाप्पा माशाळ, गणेश बिराजदार, किरण शेटे, बसवराज कोठावळे (सर्व रा. उमदी, ता. जत) या नऊजणांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

यशोधन बेदाणा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर व्यापारी व शेतकऱ्यांनी पैशासाठी तगादा लावला होता. यशोधनला शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या बेदाण्याचे पैसे वेळेत परत करता आले नाहीत. त्यामुळे पैसे देण्यासाठी जत व उमदी येथील व्यापारी, शेतकरी व अनोळखी लोकांनी बेदाण्याचे पैसे वसूल करण्यासाठी तगादा लावून वारंवार त्याच्या घरी व कुपवाड येथील कारखान्यात जाऊन शिवीगाळ, मारहाण करत ठार मारण्याची धमकी देऊन त्रास दिला. पैसे वसुलीसाठी मारहाण केल्याने त्याने आत्महत्या केल्याचे त्याची आई अपर्णा खाडिलकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

व्यवसायात तोटा झाल्याने यशोधन कर्जबाजारी झाला होता. बेदाणा व्यापाऱ्यांनी पैशासाठी तगादा लावल्याने तो विवंचनेत होता. दोन आठवड्यांपूर्वी त्याने घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. मृत यशोधनने नऊजणांची नावे लिहून त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहिली होती.

Web Title: Suicide of a young currant trader in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.