मालकाने पगार थकविल्याने कामगाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:49+5:302021-09-03T04:27:49+5:30
पोलिसांनी सुतार याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मोहन सुतार याने श्रीकॉम मोबाईल ...

मालकाने पगार थकविल्याने कामगाराची आत्महत्या
पोलिसांनी सुतार याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, मोहन सुतार याने श्रीकॉम मोबाईल रिचार्ज व मनी ट्रान्सफर या व्यवसायात अमित मोरे यास दरमहा १२ हजार रुपये पगारावर कामाला ठेवले होते. मात्र, सहा महिने काम केल्यानंतरही त्याने अमितला पगार दिला नाही. पगाराचे ७२ हजार रुपये न देता सुतार याने व्यवसायात भागीदारी म्हणून अमितकडून एकदा १५ हजार व नंतर २५ हजार असे ४० हजार रुपये घेतले. मात्र, तेही त्याने परत दिले नाहीत.
अमितने त्याची पत्नी व काकांकडून पैसे घेऊन दिले होते. काही अन्य ग्राहकांनाही पैसे गुंतविण्यास सांगितले होते. मात्र सुतार याने कोणाचेच पैसे परत दिले नसल्याने ग्राहकांकडूनही पैशांची मागणी सुरू झाली. सुतार याने पैसे थकविल्यामुळे अमितचे नातेवाईक व ग्राहकांशीही संबंध बिघडले. यामुळे अमित निराश झाला होता. नऊ महिन्यांपूर्वी १० डिसेंबर २०२० रोजी त्याने घरात विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाची चाैकशी करून नऊ महिन्यानंतर मोहन ऊर्फ मोरेश्वर सुतार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.