नवेखेड येथे दुसरे लग्न केलेल्या विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST2021-06-02T04:21:26+5:302021-06-02T04:21:26+5:30

इस्लामपूर : नवेखेड (ता. वाळवा) येथे मंगळवारी २६ वर्षीय नवविवाहितेने घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांना ...

Suicide of a second married woman at Navekhed | नवेखेड येथे दुसरे लग्न केलेल्या विवाहितेची आत्महत्या

नवेखेड येथे दुसरे लग्न केलेल्या विवाहितेची आत्महत्या

इस्लामपूर : नवेखेड (ता. वाळवा) येथे मंगळवारी २६ वर्षीय नवविवाहितेने घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांना माहिती मिळाल्यावर दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद आहे. तिचे कुटुंब आल्यानंतर शवविच्छेदन होणार आहे. तिचे पार्थिव येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

रूपाली सागर जंगम (वय २६) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. तिचे पाच महिन्यांपूर्वी नवेखेड येथील सागर जंगम याच्याशी लग्न झाले आहे. रूपालीचा हा दुसरा, तर सागरचा हा तिसरा विवाह झाला आहे, असे घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

मूळचा नवेखेड येथील सागर जंगम औरंगाबाद येथे कामानिमित्त वास्तव्यास होता. तेथे या दोघांची ओळख झाली. त्यातून त्यांची मैत्री, प्रेम आणि शेवटी लग्न झाले. डिसेंबर २०२० मध्ये दोघांचे लग्न झाले. त्यानंतर रूपाली नवेखेड येथे वास्तव्यास आली होती. मंगळवारी तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधल्यावर त्यांनी आम्ही आल्याशिवाय शवविच्छेदन करू नका, असे सांगितल्याने रूपालीचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे.

Web Title: Suicide of a second married woman at Navekhed