चाेराेची येथे विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:15+5:302021-09-11T04:27:15+5:30

ढालगाव : चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ...

Suicide of a married woman at Charachi | चाेराेची येथे विवाहितेची आत्महत्या

चाेराेची येथे विवाहितेची आत्महत्या

ढालगाव : चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. वर्षा उर्फ प्रियांका प्रशांत सरगर (वय २५, रा. करगणी, ता. आटपाडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

वर्षा उर्फ प्रियांका हिचे माहेर डफळापूर (ता. जत) तर सासर करगणी (ता. आटपाडी) आहे. ती गुरूवारी चोरोची येथे आजीकडे आली होती. शुक्रवारी एक वाजण्याच्या दरम्यान तिने चोरोची येथे मामा तुकाराम संतू गलांडे यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत चोरोचीचे पोलीस पाटील जगदीश पोरे यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक दांडगे व हवालदार विक्रम चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पंचनामा करुन ताे उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अधिक तपास हवालदार संतोष बेंबडे व मनोज पाटील करीत आहेत.

Web Title: Suicide of a married woman at Charachi