शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात जेवण न वाढल्याने महिलांसह चौघांना मारहाण-मिरजेतील घटना : सहाजणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:51 IST

सांगली : लग्नात जेवायला का वाढले नाही, याचा राग मनात धरुन तीन महिलांसह चौघांना लाथा-बुक्क्या व काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

सांगली : लग्नात जेवायला का वाढले नाही, याचा राग मनात धरुन तीन महिलांसह चौघांना लाथा-बुक्क्या व काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मिरजेतील खोतनगरमध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हितेश माने, सोन्या, विनायक (पूर्ण नावे नाहीत) व तीन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. ते मिरजेतील म्हाडा कॉलनीतील इंदिरानगरमध्ये राहतात. मारहाणीत जखमी झालेल्या राणी संजय डवरी, विद्या विष्णू कोटी, मेघा घन:श्याम दिर्डीकर व विनोद पवार (चौघे रा. खोतनगर, पवनचक्कीजवळ, मिरज) यांच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

खोतनगरमधील पवनचक्कीजवळ नातेवाईकांचे लग्न असल्याने या महिला व विनोद पवार गेले होते. लग्नापूर्वी जेवणाचा कार्यक्रम होता. नंतर अक्षतांची वेळ झाल्याने जेवण वाढायचे बंद केले होते. त्यावेळी संशयित तिथे गेले. ‘जेवण का बंद केले आहे?’, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावेळी विनोद पवार याने, अक्षतांची वेळ झाल्याने जेवण बंद ठेवले आहे. अक्षता संपल्यानंतर जेवण वाढायला सुरुवात केली जाणार आहे, तोपर्यंत थांबा, असे सांगितले. पण संशयितांनी, आम्हाला आताच जेवण पाहिजे, असा पवित्रा घेतला. यातून त्यांनी विनोद पवारशी वाद घातला. त्यानंतर ते तेथून निघून गेले. सायंकाळी सहा वाजता संशयितांनी विनोद पवार यास गाठून ‘तू आम्हाला दुपारी जेवायला का वाढले नाहीस?’, असा जाब विचारला. तसेच शिवीगाळ करुन त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी संबंधित महिला त्याला सोडविण्यास गेल्यानंतर संशयितांनी त्यांनाही काठीने मारहाण केली. याप्रकरणी रात्री उशिरा संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले.अजून अटक नाहीजखमी महिलांपैकी राणी डवरी यांनी फिर्याद दाखल केली. त्यांचे मूळ गाव घोटवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) आहे. लग्नासाठी त्या आल्या होत्या. सहाजणांनी खोतनगरमध्ये घुसून तीन महिलांसह इतरांना मारहाण करुन २४ तास होऊन गेले तरी, मिरज पोलिसांनी अजूनही एकाही संशयिताला अटक केलेली नाही.

 

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हा