मोटारीवर उसाची ट्रॉली उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:18 IST2019-12-16T00:17:28+5:302019-12-16T00:18:07+5:30
गोटखिंडी : इस्लामपूर-सांगली रस्त्यावर गाताडवाडी (ता. वाळवा) फाट्यानजीक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मोटारीवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. ...

इस्लामपूर-सांगली रस्त्यावर गाताडवाडी (ता. वाळवा) फाटा येथे थांबलेल्या मोटारीवर उसाची ट्रॉली उलटली.
गोटखिंडी : इस्लामपूर-सांगली रस्त्यावर गाताडवाडी (ता. वाळवा) फाट्यानजीक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मोटारीवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात रविवारी दुपारी दीड वाजता घडला.
मोटार (क्र. एमएच ४२ एएस ८४१२) घेऊन चालक सचिन चांगदेव घोडके (रा. चांदज, ता. माढा, जि. सोलापूर) हे सांगलीहून इस्लामपूरकडे जात होते. इस्लामपूरपासून काही अंतरावर गाताडवाडी फाट्यानजीक जुना पाचवा मैल येथे घोडके रस्त्याच्या बाजूला मोटार उभी करून ते बाजूला गेले. याचवेळी आष्ट्याहून इस्लामपूर येथील राजारामबापू साखर कारखान्याकडे ट्रॅक्टर (क्र. एमएक्सडब्ल्यू १०६) व दोन ट्रॉल्या ऊस घेऊन चालक विकास दत्ता पारेकर निघाले होते. अचानक एका ट्रॉलीचे चाक निखळल्याने ट्रॉली बाजूला उभ्या असलेल्या मोटारीवर उलटली. या अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती कळताच आष्टा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.