शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

उसाची एफआरपी कर्जमाफीच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 10:53 IST

दुष्काळ, महापूर आणि अवकाळीने संपूर्ण राज्यातील शेतकरी पिचून गेला. खरिपाचा सगळा हंगाम वाया गेला, हाती काही लागले नाही. आता ऊस गाळपासाठी गेला, तर कारखानदार एफआरपी देण्याचे नाव काढत नाहीत. या कावेबाजपणाला त्यांनी सरकारच्या कर्जमाफीची किनार जोडली आहे. एफआरपी दिली तर, सोसायटी वसुली होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची वाट पहात बसावे लागणार आहे.

ठळक मुद्देउसाची एफआरपी कर्जमाफीच्या कचाट्यातकर्जमाफीचा मुद्दा साखर कारखानदारांच्या पथ्यावर

युनूस शेख इस्लामपूर : दुष्काळ, महापूर आणि अवकाळीने संपूर्ण राज्यातील शेतकरी पिचून गेला. खरिपाचा सगळा हंगाम वाया गेला, हाती काही लागले नाही. आता ऊस गाळपासाठी गेला, तर कारखानदार एफआरपी देण्याचे नाव काढत नाहीत. या कावेबाजपणाला त्यांनी सरकारच्या कर्जमाफीची किनार जोडली आहे. एफआरपी दिली तर, सोसायटी वसुली होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची वाट पहात बसावे लागणार आहे.शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. अनेक चमत्कार घडत सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने कर्जमाफीच्या विषयाला हात घातला आहे. राज्याच्या सहकार आयुक्तांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या शेती कर्जाचा तपशील २० जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सोसायटी पातळीवर अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.गाळप झालेल्या उसाचा दर मिळणार, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या कर्जमाफीची वाट पहात बसावे लागणार आहे. कर्जमाफीची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने जानेवारी महिनासुद्धा निघून जाण्याची शक्यता आहे.

शेती कर्जाचा तपशील २० जानेवारीपर्यंत सरकारला मिळणार आहे. त्यानंतर कर्जमाफीची घोषणा होईल. अशा परिस्थितीत एफआरपी दिली तर, त्या पैशावर अगोदरच वसुली याद्या तयार करून बसलेल्या सोसायट्यांचा हक्क लागणार आहे. त्यामुळे सरकारच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. नेमका हाच मुद्दा साखर कारखानदारांच्या पथ्यावर पडला आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून या कर्जमाफीच्या आडून एफआरपी देण्याची घोषणा केली नाही. यात शेतकरी कर्जमाफी की एफआरपी अशा कचाट्यात सापडला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली