‘सखीं’ना केकसह सुग्रास भोजनाच्या टिप्स

By Admin | Updated: December 29, 2014 23:52 IST2014-12-29T22:39:24+5:302014-12-29T23:52:43+5:30

इस्लामपुरात प्रशिक्षण : खास आकर्षण बनली ‘डॉल केक’

Sugar Foods with Sugar Foods | ‘सखीं’ना केकसह सुग्रास भोजनाच्या टिप्स

‘सखीं’ना केकसह सुग्रास भोजनाच्या टिप्स

इस्लामपूर : ‘लोकमत’ सखी मंच सदस्यांसह इतर महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पाककला प्रशिक्षणात सहभागी महिलांनी केक, कुकीज, कुल्चा, नान यासह अनेक ग्रेव्हींच्या रेसीपीज शिकत आणि त्या आत्मसात करत सरत्या वर्षाला निरोप दिला. जवळपास पाच तासाहून अधिक काळ चाललेल्या या प्रशिक्षणात सुगरण सखींना सुग्रास टिप्स मिळाल्या.
येथील राजारामबापू पाटील नाट्यगृहात ‘लोकमत’ सखी मंचतर्फे नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘केक वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले होते. प्रथमेश इलेक्ट्रॉनिक्सच्या सहकार्याने हा उपक्रम झाला. ‘लोकमत’चे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, श्रध्देय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेचे
पूजन नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी ‘प्रथमेश’चे रवी सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, सौ. संगीता सूर्यवंशी, सौ. सविता सूर्यवंशी, सौ. स्वाती पवार (पुणे), अभिषेक तेवरे उपस्थित होते. कोल्हापूरच्या तेजस पाटील, प्रसाद जाधव यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
त्यानंतर सखींच्या आवडत्या प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यावर नाट्यगृहात मायक्रो ओव्हनमधील खमंग पदार्थांच्या दरवळणाऱ्या सुवासाची झुळूक मने उल्हसित करणारी ठरली. ब्लॅक फॉरेस्ट केक, पायनापल, डॉल केक, चॉकलेट केक, व्हॅनिला, हार्ट शेफ अशा विविध प्रकारच्या केकसह त्यावरील आईसिंगची सजावट, नानकटाई, कुकीज, कुल्चा, नान, पाव याची प्रात्यक्षिके झाली. त्यानंतर मायक्रो ओव्हनमधील ढोकळा, इडली, पिझ्झा, पनीर पहाडी, कबाब, ओनीअन ग्रेव्ही, पनीर टिक्का मसाला याच्या रेसीपी दाखविण्यात आल्या. मायक्रोव्हेव वापरासंबंधी माहिती देऊन त्यांच्या शंकांचे समाधान केले.
सरत्या वर्षातील (२0१४) हा शेवटचा कार्यक्रम होता. प्रथमेशच्यावतीने सखी सदस्यांसाठी खास सवलत देण्याचे रवी सूर्यवंशी यांनी जाहीर केले. सखी मंच संयोजिकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. संयोजन समितीच्या सौ. सायली लोणिष्टे, सुनंदा सोनटक्के, कौसल्या सूर्यवंशी, राजवी शहा उपस्थित होत्या. (वार्ताहर)

Web Title: Sugar Foods with Sugar Foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.