साखर कारखानदारीला सध्या वाईट दिवस

By Admin | Updated: November 14, 2014 23:23 IST2014-11-14T22:38:04+5:302014-11-14T23:23:31+5:30

पी. आर. पाटील : कारंदवाडीत राजारामबापू युनिट दोनच्या हंगामास सुरुवात

Sugar factory is currently a bad day | साखर कारखानदारीला सध्या वाईट दिवस

साखर कारखानदारीला सध्या वाईट दिवस

आष्टा : साखर कारखानदारीला वाईट दिवस आले आहेत. दिवसेंदिवस साखरेचे दर घसरत आहेत़ केंद्र व राज्य शासनाने या उद्योगाला प्रामाणिक मदत करायला हवी़ पूर्वी खासगीकडून सहकारी साखर कारखानदारीकडे लोक वळले़ आता सहकारातील लोक खासगीकरणाकडे वळत आहेत, हे अयोग्य आहे, असे प्रतिपादन राजारामबापू सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले.
कारंदवाडी (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिटच्या गळीत हंगाम प्रारंभावेळी ते बोलत होते. पत्रकार विजय चोरमारे, माजी आमदार विश्वासराव पाटील, जि़ प़ चे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पी. आर. पाटील म्हणाले की, आम्ही येथील शेतकऱ्यांना चांगला दर दिला आहे. तसेच कामगारांना न्याय देऊन, दिलेला शब्द पाळला आहे़ आम्ही ऊस तोडणी कार्यक्रम काटेकोरपणे राबविल्याने चांगला साखर उतारा मिळाला़ राजारामबापूंनी डिस्टिलरी, देशी-विदेशी मद्य, तसेच जयंत पाटील यांनी को-जन हे प्रकल्प उभे केल्याने शेतकऱ्यांना आम्ही चार पैसे जादा दर देऊ शकत आहोत़
‘सर्वोदय’चे उपाध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, संचालक नंदकुमार पाटील, रमेश हाके, संपतराव पाटील, दिनकर पाटील,भगवान पाटील, जानकास ढोले, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, लालासाहेब पाटील, शिवाजीराव साळुंखे, दिलीपराव पाटील, बाळासाहेब पाटील, प्रदीप थोरात, भीमराव पवार, कार्तिक पाटील, जे़ वाय़ पाटील, वसंतराव कदम, डी़ बी़ पाटील, जालिंदर कांबळे, सौ़ मेघाताई पाटील, दुधगावचे अविनाश कुदळे, उपस्थित होते़ संचालक एल़ बी़ माळी यांनी आभार मानले़ संपर्क अधिकारी डी़ आऱ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: Sugar factory is currently a bad day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.