विश्वासराव कारखान्यातर्फे साखर निर्यात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST2021-02-20T05:17:47+5:302021-02-20T05:17:47+5:30

शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे यंदाच्या हंगामात उत्पादित केलेली साखर शुक्रवारपासून परदेशात निर्याती ...

Sugar export started by Vishwasrao factory | विश्वासराव कारखान्यातर्फे साखर निर्यात सुरू

विश्वासराव कारखान्यातर्फे साखर निर्यात सुरू

शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे यंदाच्या हंगामात उत्पादित केलेली साखर शुक्रवारपासून परदेशात निर्याती करण्यास प्रारंभ झाला. कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी श्रीफळ फोडून निर्यातीकरिता निघालेल्या पहिल्या ट्रकचे पूजन केले. एकूण एक लाख २५ हजार ८५० क्विंटल साखर के. एन. रिसोर्सेस, मुंबई यांच्या मार्फत परदेशात निर्यात होणार आहे. यावेळी विराज नाईक, दिनकरराव पाटील, मानसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, विष्णू पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय राणे, सुरेश पाटील, संभाजी पाटील, तानाजी वनारे, विश्वास पाटील, विश्वास कदम, बिरुदेव आमरे, भीमराव गायकवाड, दत्तात्रय पाटील, श्यामराव मोहिते, कार्यकारी संचालक राम पाटील आदी उपस्थित होते.

फोटो-१९शिराळा१

Web Title: Sugar export started by Vishwasrao factory