शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

Sangli News: ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर पेटवले; सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीचे आंदोलन हिंसक वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 09:38 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी अशी मागणी केली आहे. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र सांगली जिल्ह्यात राजारामबापू, क्रांती आणि विश्वास काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत.

सांगली : सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीचे आंदोलन हिंसक वळणावर पोहोचले आहे. गुरुवारी उशिरा रात्री ऊस वाहतूक करणारे राजारामबापू, क्रांती या साखर कारखान्यांचे ट्रॅक्टर पेटविण्यात आले, तर विश्वास कारखान्याच्या ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न झाला यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राजारामबापू कारखान्याचे सर्वेसर्वा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत. क्रांती कारखान्याचे आ. अरुण लाड तर विश्वास कारखान्याचे आ. मानसिंगराव नाईक अध्यक्ष आहेत. राजारामबापू कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे पेटविण्यात आला तर क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बळवडी फाटा येथे गुरुवारी रात्री उशिरा पेटविण्यात आला. तसेच विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदुळवाडी येथेच  पेटविण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी अशी मागणी केली आहे. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. तर अन्य दोन कारखाने जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. मात्र राजारामबापू, क्रांती आणि विश्वास काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. त्यामुळेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत. बुधवारी राजारामबापू कारखान्याच्या ३५ वाहनांची हवा सोडण्यात आली. यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमठे फाटा, कडेगाव तालुक्यात रामापूर फाटा याठिकाणी वाहनाची हवा सोडून वाहतूक बंद पाडली आहे.

 याच प्रश्नावर  जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दोनवेळा सर्व कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे, तरीही एकरकमी एफआरपी जाहीर होत नाही. त्यामुळे आंदोलन हिंसक वळणावर पोहचले आहे. आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला जे जमते, ते सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना का जमत नाही? दोन्ही जिल्ह्यात किती अंतर आहे? त्या ठिकाणी सहकारी आणि खासगी अशा दोन्ही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली तर सांगली जिल्ह्यात केवळ दोन खासगी कारखान्यांनी एकरकमी एफ आर पी जाहीर केली आहे. दत्त इंडिया आणि दालमिया हे दोन्ही कारखाने केवळ पाच वर्षे चालविले जात आहेत. सहकारातील २० ते २५ वर्षे सुरू असलेले कारखाने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते आणि शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यातूनच पेटवा पेटवी सुरू आहे. आमचे कार्यकर्ते नाइलाजाने हे करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा अंत न बघता तात्काळ एक कमी एफ आर पी जाहीर करावी.

टॅग्स :Sangliसांगली